गुडघा · वेदना आणि निदान
गुडघेदुखी: कारण काय आणि उपचार कसे ठरवायचे?
गुडघेदुखी ही एक तक्रार आहे, निदान नाही. वेगवेगळ्या कारणांनी गुडघेदुखी होऊ शकते, आणि प्रत्येक कारणाचा उपचार वेगळा असतो. म्हणून गुडघेदुखीवर उपचार करण्यापूर्वी ती नेमकी कशामुळे होत आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे.
डॉ. प्रशांत पराते · खांदा, गुडघा आणि क्रीडा दुखापत शल्यचिकित्सक · ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर आणि साईनाथ हॉस्पिटल, मोशी, पिंपरी-चिंचवड
सर्वात महत्त्वाचे
गुडघेदुखी म्हणजे लगेच operation किंवा replacement नाही. बहुतेक गुडघेदुखीचे कारण शोधून योग्य उपचार केल्यास शस्त्रक्रियेची गरज नसते. उपचार वेदनेच्या नावावर नाही, वेदनेच्या कारणावर ठरतो.
गुडघेदुखी कशामुळे होते?
गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात. काही सामान्य कारणे:
दुखापतीमुळे
- ACL (अस्थिबंध) फाटणे
- Meniscus (गादी) फाटणे
- MCL, PCL किंवा इतर ligament injury
- Fracture (हाड मोडणे)
- Cartilage (कूर्चा) injury
- Patellar dislocation (गुडघ्याची वाटी सरकणे)
झीज (Degenerative) मुळे
- Osteoarthritis (संधिवात)
- Degenerative meniscus tear
- Chondromalacia (कूर्चा मऊ होणे)
इतर कारणे
- Patellofemoral pain (वाटीभोवती दुखणे)
- Tendinitis (कंडरा सुजणे)
- Bursitis
- Baker’s cyst (गुडघ्याच्या मागे गाठ)
- Referred pain (कमरेतून किंवा नितंबातून येणारे दुखणे)
- Inflammatory arthritis
- Infection (संक्रमण), क्वचित
एकच लक्षण अनेक कारणांमुळे होऊ शकते. म्हणून स्वतः निदान करून उपचार करणे टाळा.
तुमच्या गुडघ्यात नेमके कुठे दुखते?
दुखण्याची जागा कारणाचा अंदाज देऊ शकते, पण निदान तपासणीनंतरच होते.

पुढे दुखणे
गुडघ्याच्या वाटीभोवती किंवा खाली दुखणे. Patellofemoral pain, patellar tendinitis, chondromalacia किंवा cartilage injury असू शकते. जिने चढताना, खुर्चीतून उठताना किंवा बराच वेळ बसल्यानंतर जास्त त्रास होतो.
आतल्या बाजूला दुखणे
Medial meniscus tear, medial compartment arthritis, MCL injury किंवा pes anserine bursitis असू शकते. चालताना, वळताना किंवा जिना उतरताना जास्त दुखते.
बाहेरच्या बाजूला दुखणे
Lateral meniscus tear, lateral compartment disease, LCL injury किंवा iliotibial band syndrome असू शकते.
मागे दुखणे
Baker’s cyst, posterior meniscus tear किंवा PCL injury असू शकते. गुडघ्याच्या मागे सूज किंवा ताण जाणवू शकतो.
लक्षणे काय सांगतात?
तुमची लक्षणे कारणाचा अंदाज देतात. पण एका लक्षणावरून निदान ठरत नाही.

1. दुखापतीनंतर अचानक सूज
काही तासांत गुडघा सुजणे हे ligament injury, fracture किंवा गंभीर आतील दुखापतीचे लक्षण असू शकते. दुखापतीनंतर लगेच मोठी सूज आल्यास तपासणी करून घ्या.
2. गुडघा अडकणे (Locking)
गुडघा पूर्ण सरळ न होणे हे displaced meniscus tear, loose body किंवा इतर mechanical problem चे लक्षण असू शकते.
गुडघा खरोखर lock झाला असेल, पूर्ण सरळ होत नसेल, तर लवकर दाखवा. उशीर झाल्यास meniscus वाचवणे कठीण होऊ शकते.
3. गुडघा सरकणे / Giving way
चालताना किंवा वळताना गुडघा अचानक निसटणे हे ACL injury, ligament instability किंवा patellar instability चे लक्षण असू शकते.
4. जिना चढताना/उतरताना, खुर्चीतून उठताना दुखणे
Patellofemoral joint, cartilage किंवा सुरुवातीच्या arthritis ची शक्यता. बराच वेळ एका जागी बसल्यानंतर उठताना जास्त त्रास होत असल्यास हे लक्षण विशेष महत्त्वाचे आहे.
5. हळूहळू वाढणारे दुखणे आणि कडकपणा (Stiffness)
Degenerative changes, arthritis किंवा झीज असण्याची शक्यता. सकाळी उठताना कडक वाटणे, चालल्यावर बरे वाटणे, पण जास्त चालल्यावर पुन्हा दुखणे हा एक सामान्य pattern आहे.
एक किंवा अधिक लक्षणे एकत्र असू शकतात. लक्षणांची तीव्रता, कालावधी आणि तुमची कामे यांचा विचार करून treatment ठरतो.
निदान कसे होते?
तपासणी (Clinical Examination) हा निदानाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
डॉक्टर तुमची history ऐकतात, गुडघा तपासतात, कुठे दुखते ते शोधतात, गुडघ्याची stability तपासतात, हालचाल पाहतात आणि clinical examination च्या आधारावर कोणती investigation आवश्यक आहे ते ठरवतात.
फक्त MRI करून कारण शोधणे हा योग्य मार्ग नाही. तपासणीनंतर कोणती चाचणी आवश्यक आहे ते ठरवले जाते.
X-ray की MRI?
प्रत्येक गुडघेदुखीसाठी MRI आवश्यक नसते. योग्य तपासणी तेव्हाच निवडा, जेव्हा डॉक्टर तपासणी करून आवश्यकतेनुसार सांगतात.

X-ray कधी?
X-ray हा पहिला आणि बहुतेक वेळा पुरेसा असणारा तपास आहे. यामध्ये दिसते:
- हाडे (fracture आहे का)
- Arthritis / Joint space narrowing (सांध्यातील झीज)
- पायाची Alignment (सरळपणा / वाकडेपणा)
- उभे राहून वजन घेताना सांध्याची स्थिती
Arthritis चे निदान करण्यासाठी standing weight-bearing X-ray आवश्यक असतो. झोपून काढलेला X-ray arthritis चे खरे चित्र दाखवत नाही.
MRI कधी?
MRI हा महागडा आणि जास्त माहिती देणारा तपास आहे, पण तो नेहमीच आवश्यक नसतो. MRI मध्ये दिसते:
- Meniscus (गादी)
- ACL, PCL आणि इतर Ligaments
- Cartilage (कूर्चा)
- Tendons आणि soft tissues
- Bone marrow abnormalities
MRI चा उपयोग विशेषतः ligament injury, meniscus tear, cartilage damage आणि soft tissue pathology संशयित असताना होतो.
MRI मध्ये काहीतरी “दिसले” म्हणजे त्याला लगेच उपचार लागतो असे नाही. MRI वर meniscus tear, cartilage signal change किंवा fluid दिसणे अनेक लोकांमध्ये incidental finding असू शकते ज्याला उपचाराची गरज नसते. उपचार MRI report वर नाही, रुग्णाच्या symptoms आणि examination वर ठरतो.
गुडघेदुखीपासून योग्य उपचारापर्यंत
योग्य निदान, योग्य पर्याय, योग्य उपचार, चांगले परिणाम.

1. Non-operative / साधे उपचार
बहुतेक गुडघेदुखीचा पहिला उपचार शस्त्रक्रिया नसतो. Physiotherapy, स्नायू बळकट करणे, वजन नियंत्रण, activity modification, pain management आणि आवश्यक असल्यास injections. अनेक रुग्णांना यामुळे चांगला फायदा होतो.
2. Meniscus Injury
लक्षणे कमी असल्यास निरीक्षण. योग्य रुग्णामध्ये Meniscus repair. खरोखर repair न होणारा फाटलेला तुकडा त्रासदायक असल्यास मर्यादित काढणी.
3. Ligament Instability
Physiotherapy ने stability मिळवणे. खेळाडू किंवा तरुण active रुग्णामध्ये Ligament reconstruction चा विचार. Functional stability महत्त्वाची.
4. Malalignment / Early Compartment Disease
वजन वहनाची दिशा सुधारणा. Osteotomy ने सांध्यावरील ताण कमी करणे. काही वर्षे सांधा टिकवण्यास मदत होते.
5. Advanced Arthritis
वेदना नियंत्रण, physiotherapy, injections, support. रोजच्या कामात अडथळा असल्यास Knee Replacement. रुग्णानुसार योग्य पर्याय निवडणे.
गुडघेदुखीवर स्वतः उपचार करणे का टाळावे?
गुडघेदुखी सुरू झाल्यावर अनेक रुग्ण स्वतःहून pain killers घेतात, balm लावतात, YouTube वरचे व्यायाम करतात किंवा MRI करून त्यावरून निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात.
यात धोका काय?
- चुकीचे निदान: आतल्या बाजूचे दुखणे arthritis मुळे असू शकते किंवा meniscus tear मुळे. दोन्हींचा उपचार वेगळा आहे.
- चुकीचे व्यायाम: ACL tear असलेल्या गुडघ्यावर चुकीचे व्यायाम केल्यास meniscus आणि cartilage चे आणखी नुकसान होऊ शकते.
- Pain killers ने वेदना दबवणे: कारण शोधल्याशिवाय pain killers खाणे म्हणजे fire alarm बंद करून आग विसरणे.
- उशीर: काही injuries मध्ये वेळेवर उपचार न केल्यास repairable meniscus irreparable होऊ शकतो, fixable avulsion non-fixable होऊ शकतो.
कधी डॉक्टरांकडे जावे?
लवकर दाखवा जर:
- दुखापतीनंतर गुडघा खूप सुजला
- गुडघा पूर्ण सरळ होत नाही (locking)
- गुडघा सरकतो किंवा giving way होतो
- चालता येत नाही
- ताप, लालसरपणा आणि सूज एकत्र आहेत
तपासणी करून घ्या जर:
- 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त गुडघेदुखी कायम आहे
- दुखणे हळूहळू वाढत आहे
- जिने चढणे/उतरणे, उकिडवे बसणे कठीण होत आहे
- गुडघा सकाळी कडक वाटतो
- गुडघ्यात clicking, catching किंवा सूज वारंवार येते
- खेळताना गुडघ्यावर विश्वास वाटत नाही
माझा दृष्टिकोन
मी प्रत्येक गुडघेदुखीला operation ची गरज आहे असे मानत नाही.
पण योग्य निदान न करता pain killers वर चालवत राहणे हेही योग्य नाही.
पहिले काम म्हणजे गुडघेदुखीचे नेमके कारण शोधणे.
कारण कळले की उपचार स्पष्ट होतो: physiotherapy, injection, activity change, alignment correction, meniscus repair, ligament surgery किंवा replacement. प्रत्येक रुग्णाला प्रत्येक गोष्ट लागत नाही.
काही सामान्य प्रश्न
गुडघेदुखी म्हणजे arthritis (संधिवात) असतो का?
नाही. Arthritis हे गुडघेदुखीचे एक कारण आहे, एकमेव कारण नाही. तरुण व्यक्तींमध्ये ligament injury, meniscus tear, patellofemoral pain आणि अनेक इतर कारणे जास्त सामान्य आहेत.
गुडघेदुखी असल्यास MRI करायलाच हवे का?
नाही. प्रत्येक गुडघेदुखीसाठी MRI आवश्यक नसते. X-ray हा पहिला आणि बहुतेक वेळा पुरेसा तपास आहे. MRI तपासणीनंतर आवश्यक वाटल्यासच सांगितले जाते.
गुडघेदुखी म्हणजे replacement लागेल का?
बहुतेक गुडघेदुखी replacement शिवाय बरी होते. Replacement हा शेवटचा पर्याय आहे, तो तेव्हाच विचारात घ्यायचा जेव्हा advanced arthritis मुळे दैनंदिन काम अत्यंत कठीण झाले असेल आणि इतर उपचार अपुरे पडले असतील.
व्यायाम केल्यास गुडघेदुखी वाढेल का?
योग्य व्यायाम केल्यास गुडघेदुखी कमी होते, वाढत नाही. पण चुकीचे व्यायाम किंवा चुकीच्या वेळी केलेले व्यायाम त्रास वाढवू शकतात. म्हणून physiotherapist च्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.
वजन कमी केल्यास गुडघेदुखीवर फरक पडतो का?
हो. शरीराचे वजन जास्त असल्यास गुडघ्यावरचा ताण वाढतो. वजन कमी करणे हा विशेषतः arthritis मुळे होणाऱ्या गुडघेदुखीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपचार आहे.
गुडघेदुखी? कारण शोधूया.
उपचार वेदनेच्या नावावर नाही, वेदनेच्या कारणावर ठरतो.
तुमचे X-ray किंवा MRI असल्यास घेऊन या. नसल्यास तपासणीनंतर आवश्यक असल्यास सांगितले जाईल.
अपॉइंटमेंटसाठी
साईनाथ हॉस्पिटल, मोशी, पिंपरी-चिंचवड
८६००० ०५८८६
सोम ते शुक्र, सकाळी १० ते दुपारी ४ · शनि, सकाळी १० ते दुपारी १२
ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे
०२० २७९९ २१५०
सोम ते शनि, संध्याकाळी ५.३० ते ६.३० · OPD 5
हे पान रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणासाठी आहे. ही माहिती प्रत्यक्ष तपासणी आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. शेवटचा आढावा: ऑगस्ट २०२६, डॉ. प्रशांत पराते, DNB Orthopaedics, Fellowship in Arthroscopy & Sports Medicine (Thammasat University Hospital, Thailand). MMC Reg. 2006042129.