गुडघा · मेनिस्कस
मेनिस्कस फाटणे: दुरुस्ती की काढणे?
मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातील केवळ “गादी” नाही. ती गुडघ्यावर येणारा भार पसरवते, धक्के शोषून घेते, गुडघ्याला स्थिरता देते आणि कार्टिलेजचे संरक्षण करण्यास मदत करते.
MRI मध्ये Meniscus tear दिसल्यावर अनेक रुग्णांचा पहिला प्रश्न असतो:
“ऑपरेशन लागेल का?”
आणि ऑपरेशन लागल्यास:
“मेनिस्कस शिवून वाचवता येईल का, की काढावी लागेल?”
दोन्ही प्रश्नांची उत्तरे प्रत्येक रुग्णासाठी वेगळी असतात.
प्रत्येक Meniscus tear ला ऑपरेशन लागत नाही. आणि ऑपरेशन लागले तरी प्रत्येक फाटलेली Meniscus काढावी लागत नाही.
माझा प्रयत्न शक्य तितकी functioning Meniscus वाचवण्याचा असतो:
जे वाचवता येईल ते वाचवूया.
जे repair करता येईल ते repair करूया.
जे खरोखर वाचवता येणार नाही तेवढेच trim करूया.
डॉ. प्रशांत पराते · खांदा, गुडघा आणि क्रीडा दुखापत शल्यचिकित्सक · ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर आणि साईनाथ हॉस्पिटल, मोशी, पिंपरी-चिंचवड
मेनिस्कस म्हणजे काय?
प्रत्येक गुडघ्यात दोन Meniscus असतात:
- Medial Meniscus: गुडघ्याच्या आतील बाजूला
- Lateral Meniscus: गुडघ्याच्या बाहेरील बाजूला
दोन्ही अर्धचंद्राकृती fibrocartilage structures मांडीचे हाड म्हणजे Femur आणि पायाचे हाड म्हणजे Tibia यांच्या मध्ये असतात.
Meniscus ची मुख्य कामे:
- शरीराचा भार गुडघ्यावर मोठ्या क्षेत्रात पसरवणे
- धक्के शोषून घेणे
- कार्टिलेजचे संरक्षण करणे
- गुडघ्याच्या stability मध्ये मदत करणे
- Joint lubrication आणि proprioception मध्ये योगदान देणे
मेनिस्कस का वाचवायची?
Meniscus मुळे Femur कडून येणारा भार Tibia च्या cartilage वर मोठ्या क्षेत्रात पसरतो.
Meniscus चा मोठा functioning भाग गमावल्यास हा भार लहान contact area वर केंद्रित होऊ शकतो. त्यामुळे cartilage वरचा contact stress वाढतो आणि कालांतराने joint degeneration चा धोका वाढू शकतो.
म्हणून आजच्या Meniscus surgery मध्ये शक्य तितकी functional Meniscus टिकवून ठेवण्यावर भर दिला जातो. Traumatic tears मध्येही international consensus meniscal preservation ला first-line surgical philosophy मानतो.

मेनिस्कस कशी फाटते?
1. Traumatic Meniscus Tear
तरुण किंवा active व्यक्तीमध्ये अचानक twisting injury मुळे Meniscus फाटू शकते. उदाहरणार्थ:
- Football, cricket, kabaddi किंवा badminton खेळताना
- अचानक direction change करताना
- पाय जमिनीवर अडकलेला असताना शरीर वळल्याने
- उडी मारून उतरताना
- पडल्यामुळे
- ACL injury सोबत
अशा tears मध्ये tissue तुलनेने healthy असल्यामुळे repair करण्याची शक्यता चांगली असू शकते.
2. Degenerative Meniscus Tear
वयाबरोबर Meniscus tissue मध्ये degenerative बदल होऊ शकतात. अशा वेळी मोठी injury नसतानाही, खाली बसताना, उठताना, जिना चढताना किंवा उकिडवे बसताना देखील Meniscus tear होऊ शकते.
MRI वर degenerative Meniscus tear दिसली म्हणजे arthroscopy किंवा operation आवश्यकच आहे असे नाही.
मेनिस्कस फाटल्यावर काय लक्षणे दिसतात?
- गुडघ्याच्या आतील किंवा बाहेरील joint line वर वेदना
- Squatting करताना त्रास
- जिना चढताना किंवा उतरताना वेदना
- गुडघा वळवताना दुखणे
- सूज
- Clicking किंवा catching
- गुडघ्यात काहीतरी अडकत असल्यासारखे वाटणे
- काही tears मध्ये locking
ACL injury सोबत असेल तर गुडघा सरकल्यासारखा किंवा giving-way होण्याचा त्रासही असू शकतो.
गुडघा “Lock” होणे म्हणजे काय?
Pain मुळे गुडघा हलवायला भीती वाटणे आणि mechanical block मुळे गुडघा प्रत्यक्ष पूर्ण सरळ न होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मोठ्या displaced bucket-handle tear मध्ये Meniscus चा fragment joint मध्ये अडकू शकतो आणि गुडघा पूर्ण सरळ होत नाही.
गुडघा खरोखर lock झाला असेल तर लवकर तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. उशीर झाल्यास displaced Meniscus tissue ची quality आणि reducibility बदलू शकते आणि repair कठीण होऊ शकते.
निदान कसे होते?
तपासणी: Clinical examination अत्यंत महत्त्वाची आहे. Joint-line tenderness, knee movement, McMurray सारख्या tests आणि ACL सहित गुडघ्याची stability तपासली जाते.
MRI: Tear कुठे आहे, tear pattern, tear किती मोठी आहे, ACL किंवा इतर ligament injury, cartilage injury आणि root involvement याबद्दल महत्त्वाची माहिती मिळते.
X-ray: Meniscus X-ray वर दिसत नाही. पण arthritis आहे का, joint space कशी आहे, हाडांची स्थिती आणि alignment याबद्दल माहिती मिळू शकते. Significant varus किंवा valgus संशयित असल्यास standing alignment radiographs लागू शकतात.
MRI मध्ये Meniscus tear दिसली म्हणजे operation लागते का?
नाही.
हा या पानावरील सर्वात महत्त्वाचा संदेश आहे.
MRI रिपोर्टचा उपचार केला जात नाही. रुग्णाचा उपचार केला जातो.
Treatment ठरवताना पाहिले जाते: रुग्णाचे वय, injury कशी झाली, symptoms, true locking आहे का, tear traumatic आहे की degenerative, tear pattern, tear location, tissue quality, ACL किंवा इतर ligament injury, cartilage ची condition, knee alignment, activity आणि sport requirements.
काही लोकांच्या MRI मध्ये Meniscus tear दिसते पण त्यांची symptoms त्या tear मुळे नसू शकतात.
प्रत्येक Meniscus tear ला operation लागते का?
नाही.
Operation शिवाय treatment योग्य असू शकते जेव्हा:
Tear stable आहे, significant mechanical symptoms नाहीत, degenerative tear physiotherapy ला respond करत आहे आणि patient ची दैनंदिन कामे व्यवस्थित चालतात. Treatment मध्ये physiotherapy, strengthening, activity modification, weight management आणि pain management यांचा समावेश असू शकतो.
Surgery चा विचार केला जाऊ शकतो जेव्हा:
True mechanical locking आहे, displaced tear आहे, repairable traumatic tear आहे, symptoms योग्य non-operative treatment नंतरही टिकून आहेत, ACL reconstruction सोबत repairable Meniscus injury आहे, root किंवा significant radial tear सारखी biomechanically important injury आहे, किंवा young active patient मध्ये Meniscus preservation ची meaningful opportunity आहे.
रक्तपुरवठा आणि healing
Meniscus च्या सर्व भागाला सारखा blood supply नसतो. Peripheral capsule जवळ blood supply जास्त असतो आणि inner free edge कडे कमी होत जातो.

- Red-Red Zone (बाहेरील vascular भाग): Healing potential तुलनेने चांगला.
- Red-White Zone (मधला भाग): Blood supply कमी असला तरी अनेक tears repair करता येतात.
- White-White Zone (आतला relatively avascular भाग): Biological healing potential कमी असतो.
पण: White-White = “repair अशक्य” असे नाही. Repairability फक्त blood supply वर ठरत नाही. Tear pattern, tissue quality, patient age, chronicity, ACL reconstruction आणि repair construct यांचाही विचार करावा लागतो.
Meniscus tear चे प्रकार
Tear चा pattern हा treatment ठरवताना अत्यंत महत्त्वाचा असतो. पण MRI वर tear चे नाव वाचूनच “repair होईल” किंवा “काढावी लागेल” असा अंतिम निर्णय घेता येत नाही.

Vertical Longitudinal Tear
Meniscus च्या circumferential fibres च्या दिशेने tear असते. Peripheral vascular zone मध्ये आणि tissue quality चांगली असल्यास हे tears repair साठी चांगले candidates असतात.
Bucket-Handle Tear
हा मोठा longitudinal tear आहे. फाटलेला Meniscus fragment joint च्या मध्यभागी displaced होऊ शकतो. त्यामुळे knee lock होऊ शकतो. Fragment anatomical position मध्ये परत आणता येत असेल आणि tissue sutures धरू शकत असेल तर repair करून Meniscus वाचवण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असतो.
Radial Tear
Radial tear Meniscus च्या circumferential fibres च्या आडव्या दिशेने जाते. हे fibres Meniscus ला load चे hoop stress मध्ये रूपांतर करून भार पसरवण्यास मदत करतात. मोठा किंवा complete radial tear या mechanism ला गंभीरपणे बाधा आणू शकतो.
पूर्वी अनेक radial tears काढल्या जात असत. आज modern repair techniques मुळे selected radial tears, विशेषतः peripheral आणि complete tears, repair करण्याची क्षमता वाढली आहे.
Horizontal Tear
Horizontal tear मध्ये Meniscus वरच्या आणि खालच्या layers मध्ये विभागली जाते. सर्व horizontal tears ना surgery किंवा repair आवश्यक नसते. पण younger patient, traumatic component, appropriate symptoms आणि चांगली tissue quality असल्यास selected horizontal tears repair करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
Flap आणि Complex Tears
Severely degenerative, fragmented tissue sutures reliably धरत नसेल तर repair शक्य नसू शकते. अशावेळी फक्त symptomatic unstable आणि non-viable portion trim करून maximum functional Meniscus preserve करणे हे उद्दिष्ट असते.
“Repair कठीण आहे” आणि “Repair अशक्य आहे” या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
Meniscus Root Tear
Meniscus चे roots तिला Tibia ला anchor करतात. Root attachment तुटल्यास Meniscus बाहेरच्या दिशेने extrude होऊ शकते आणि तिची normal load-distribution क्षमता गंभीरपणे कमी होऊ शकते. Biomechanical studies मध्ये complete posterior root tear ची अवस्था total meniscectomy नंतरच्या knee सारखी असल्याचे दिसले आहे. म्हणून root tear हा साधा छोटा tear नाही.
Root repair कोणाला?
Appropriately selected symptomatic patient मध्ये, cartilage reasonably preserved असेल, advanced arthritis नसेल, Meniscus tissue repair करण्यास योग्य असेल आणि alignment acceptable असेल किंवा आवश्यक असल्यास correct करता येत असेल, तर anatomical root repair चा विचार केला जातो.
Ramp Lesion
Ramp lesion हा medial Meniscus च्या posterior meniscocapsular region मधील tear आहे. तो विशेषतः ACL injury सोबत दिसू शकतो. काही ramp lesions MRI वर subtle असतात. म्हणून ACL reconstruction करताना posterior compartment चे systematic assessment महत्त्वाचे असते. Unstable ramp lesion आढळल्यास repair केला जाऊ शकतो.
ACL आणि Meniscus injury एकत्र का दिसतात?
Acute twisting injury मध्ये ACL आणि Meniscus दोन्ही एकाच वेळी फाटू शकतात. दुसरी परिस्थिती म्हणजे chronic ACL-deficient knee. ACL फाटल्यानंतर repeated giving-way होत राहिल्यास Meniscus secondary stabiliser म्हणून जास्त load घेते आणि कालांतराने secondary tear होऊ शकते.
म्हणून ACL injury मध्ये Meniscus preservation हा long-term knee protection चा महत्त्वाचा भाग आहे.
ACL reconstruction सोबत Meniscus repair याबद्दल सविस्तर मार्गदर्शक उपलब्ध आहे.
Meniscus Repair कशी केली जाते?
All-Inside Repair
Repair arthroscope मधून joint च्या आतून केली जाते. Modern all-inside devices posterior Meniscus tears साठी विशेष उपयोगी आहेत. Accessory suture-retrieval incision टाळता येऊ शकतो. मी अनेक posterior horn tears मध्ये, विशेषतः selected lateral Meniscus tears मध्ये, ही technique पसंत करतो. Implant cost conventional sutures पेक्षा जास्त असू शकतो. महत्त्वाच्या neurovascular structures knee च्या मागे असल्यामुळे device depth आणि trajectory योग्य ठेवणे आवश्यक असते.
Inside-Out Repair
Needles Meniscus मधून joint च्या आतून बाहेर pass केल्या जातात आणि accessory incision मधून sutures retrieve करून capsule वर बांधल्या जातात. ही traditional gold-standard technique मानली जाते. Precise suture placement, strong fixation आणि मोठ्या tears मध्ये अनेक sutures वापरण्याची क्षमता हे फायदे आहेत. अतिरिक्त incision आणि posterior structures सुरक्षित ठेवण्यासाठी careful dissection हे तोटे आहेत.
Outside-In Repair
Needle बाहेरून joint मध्ये pass केली जाते. Anterior Meniscus tears मध्ये ही technique विशेष उपयोगी असू शकते. ती selected cases मध्ये वापरली जाते.
एकाच knee मध्ये एकापेक्षा जास्त repair techniques वापरल्या जाऊ शकतात. उद्दिष्ट कोणते device वापरले हे नाही. उद्दिष्ट Meniscus stable आणि सुरक्षित पद्धतीने preserve करणे आहे.
Meniscus Repair की Partial Meniscectomy?
| Meniscus Repair | Limited Partial Meniscectomy |
|---|---|
| Native Meniscus tissue टिकते | काढलेले tissue परत वाढत नाही |
| Long-term cartilage protection | Recovery साधारण जलद |
| Healing साठी वेळ लागतो | Functional rim जपणे महत्त्वाचे |
| Rehabilitation अधिक protective | Genuinely non-repairable tissue साठी |
| 100% heal होईल याची हमी नसते | Meniscus loss चे long-term consequences |
माझा दृष्टिकोन: Meniscus Preservation First
प्रत्येक repair यशस्वी होईलच असे नाही.
पण repair ची reasonable biological आणि mechanical शक्यता असताना, विशेषतः तरुण patient मध्ये, Meniscus वाचवण्याचा प्रयत्न महत्त्वाचा असू शकतो.
जे वाचवता येईल ते वाचवूया. जे repair करता येईल ते repair करूया. जे खरोखर repair होऊ शकत नाही तेवढेच trim करूया.
Functioning Meniscus tissue काढणे हा irreversible निर्णय असल्यामुळे preservation ची reasonable opportunity गमावू नये हा मूलभूत विचार आहे.
Alignment मुळे Meniscus Repair वर परिणाम होतो का?
हो. हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित मुद्दा आहे.
जर पायाला significant varus (bow-leg) किंवा valgus (knock-knee) deformity असेल, तर knee च्या एका compartment वर disproportionately जास्त load येऊ शकतो.
अशा selected patients मध्ये फक्त Meniscus repair पुरेशी नसू शकते. Osteotomy करून alignment correction करण्याचा विचार करावा लागू शकतो. हा निर्णय degree of deformity, mechanical axis, cartilage status, meniscus tear, symptoms, age आणि activity level या सर्वांचा विचार करून घेतला जातो.
Meniscus Repair fail का होऊ शकते?
- Poor tissue quality
- Chronic tear
- Complex tear configuration
- Limited vascularity
- Large radial किंवा root injury
- Persistent ligament instability
- Significant malalignment
- Rehabilitation restrictions न पाळणे
- Re-injury
यापैकी एखादा factor असणे म्हणजे repair नक्की fail होणार असे नाही.
Meniscus Repair नंतर Rehabilitation
प्रत्येक Meniscus repair साठी एकच rehabilitation protocol नसतो. ही गोष्ट विशेष महत्त्वाची आहे.
Rehabilitation ठरवताना tear pattern, repair stability, root involvement, radial tear आहे का, tissue quality, ACL reconstruction सोबत आहे का, आणि इतर procedure झाली आहे का हे पाहिले जाते.
- Stable vertical repair: काही stable vertical repairs मध्ये relatively early किंवा full weight bearing शक्य असू शकते.
- Radial / Horizontal / Complex repair: Weight bearing आणि knee flexion वर सुरुवातीला अधिक restrictions.
- Root repair: सर्वात अधिक protective. सुरुवातीचे 6 आठवडे non-weight-bearing आणि flexion 0 ते 90° पर्यंत मर्यादित.
दुसऱ्या patient चा rehabilitation protocol स्वतःसाठी वापरू नका. तुमच्या surgery मध्ये नेमके काय repair केले आहे त्यावर तुमचा protocol ठरतो.
Deep Squatting कधी करता येते?
याचे एक universal उत्तर नाही. Deep loaded flexion, squatting, lunging आणि twisting activities मध्ये Meniscus वर जास्त stress येऊ शकतो. Calendar वरची एक तारीख पूर्ण झाली म्हणून deep squat सुरू करणे योग्य नाही.
Meniscus चा मोठा भाग आधीच काढला असेल तर?
काही patients मध्ये previous meniscectomy नंतर सुरुवातीला knee चांगला असतो. कालांतराने काही patients मध्ये एका compartment मध्ये persistent pain, activity नंतर swelling, running किंवा prolonged walking tolerance कमी होणे, आणि progressive cartilage overload अशी समस्या निर्माण होऊ शकते.
याला काही परिस्थितीत post-meniscectomy syndrome म्हटले जाते. यामुळेच original surgery च्या वेळी शक्य तितकी Meniscus preserve करण्याला महत्त्व आहे.
Meniscus Transplant म्हणजे काय?
जर relatively young patient मध्ये medial किंवा lateral Meniscus चा मोठा भाग previous surgery किंवा irreparable injury मुळे गेला असेल आणि त्या compartment मध्ये persistent symptoms असतील, तर selected patients मध्ये Meniscus Allograft Transplantation चा विचार करता येतो.
Donor Meniscus patient च्या knee च्या आकाराशी match करून implant केली जाते. पण ही routine procedure नाही. Patient selection मध्ये significant Meniscus deficiency, compartment-specific symptoms, cartilage condition, knee stability, alignment आणि age or activity expectations पाहिले जाते.
Meniscus transplant म्हणजे advanced arthritis साठी knee replacement चा पर्याय नाही. ती selected patients मध्ये joint-preservation strategy चा भाग आहे.
उपचाराचा निर्णय कसा घेतला जातो?

अंतिम निर्णय Arthroscopy मध्ये बदलू शकतो
MRI अत्यंत उपयुक्त आहे. पण MRI प्रत्येक वेळी Meniscus tissue ची actual quality आणि repairability पूर्णपणे सांगू शकत नाही.
Arthroscopy मध्ये प्रत्यक्ष पाहता येते: exact tear configuration, tissue quality, fragment reducible आहे का, tear stable आहे का, sutures tissue मध्ये hold करतील का, root attachment, ramp lesion, cartilage ची actual condition, आणि MRI वर स्पष्ट न दिसलेली associated pathology.
म्हणून surgery पूर्वी मी patients सोबत वेगवेगळ्या शक्यतांची चर्चा करतो: repair, repair + limited trimming, partial meniscectomy, किंवा काही परिस्थितीत stable lesion ला तसेच ठेवणे. Final decision actual arthroscopic findings वर अवलंबून असू शकतो.
तुमच्या surgeon ला हे प्रश्न विचारा
माझी Meniscus tear traumatic आहे की degenerative?
Tear कोणत्या pattern ची आहे?
ती repair करता येण्याची शक्यता किती आहे?
Repair uncertain असेल तरी Meniscus preserve करण्याचा प्रयत्न करता येईल का?
माझा ACL आणि इतर ligaments ठीक आहेत का?
Root tear किंवा ramp lesion आहे का?
माझ्या पायाची alignment normal आहे का?
Repair केल्यास weight bearing आणि bending वर काय restrictions असतील?
Repair शक्य नसेल तर किती Meniscus trim करावी लागेल?
Meniscus चा मोठा भाग गेला तर भविष्यात कोणते joint-preservation options उपलब्ध आहेत?
काही सामान्य प्रश्न
MRI मध्ये Meniscus tear दिसली म्हणजे operation लागते का?
नाही. अनेक tears, विशेषतः degenerative tears, non-operative treatment ने manage करता येतात. Treatment symptoms, examination, tear characteristics आणि patient च्या activity वर ठरतो.
Meniscus tear स्वतःहून बरी होऊ शकते का?
काही small peripheral tears heal होऊ शकतात आणि काही stable tears ला surgery ची गरज नसते. प्रत्येक MRI tear anatomical healing होईलच असे नाही, पण symptoms surgery शिवायही सुधारू शकतात.
Meniscus Repair चांगली की Meniscus काढणे?
जर symptomatic tear repair करण्यास योग्य असेल तर Meniscus preservation ला प्राधान्य दिले जाते. पण प्रत्येक tear repair करता येत नाही.
Meniscus काढल्यावर ती पुन्हा वाढते का?
काढलेला Meniscus tissue मूळ स्वरूपात परत वाढत नाही.
Meniscus Repair पुन्हा फाटू शकते का?
हो. Repair 100% guaranteed नसते. Tissue quality, tear pattern, healing, rehabilitation आणि re-injury यावर परिणाम अवलंबून असतो.
Repair नंतर चालता कधी येते?
Tear आणि repair type वर अवलंबून असते. काही stable vertical repairs मध्ये early weight bearing शक्य असते, तर radial आणि विशेषतः root repairs मध्ये अनेक आठवडे protected किंवा non-weight-bearing लागू शकते.
Deep squat कधी करता येते?
एकच universal तारीख नाही. Repair type, healing आणि rehabilitation milestones नुसार surgeon आणि physiotherapist progression ठरवतात.
Meniscus Transplant कधी विचारात घेतली जाते?
मोठ्या प्रमाणात Meniscus loss झालेल्या, persistent compartment-specific symptoms असलेल्या आणि cartilage, alignment व stability योग्य असलेल्या selected younger patients मध्ये तिचा विचार करता येतो.
गुडघ्यात वेदना, सूज किंवा locking?
MRI मध्ये “Meniscus tear” लिहिले आहे म्हणून लगेच Meniscus काढण्याचा निर्णय घेऊ नका.
तुमची MRI आणि उपलब्ध X-rays घेऊन या. Operation आवश्यक आहे का, Meniscus repair करता येईल का आणि rehabilitation कसे असेल याबद्दल तपशीलवार चर्चा करता येईल.
अपॉइंटमेंटसाठी
साईनाथ हॉस्पिटल, मोशी, पिंपरी-चिंचवड
८६००० ०५८८६
सोम ते शुक्र, सकाळी १० ते दुपारी ४ · शनि, सकाळी १० ते दुपारी १२
ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे
०२० २७९९ २१५०
सोम ते शनि, संध्याकाळी ५.३० ते ६.३० · OPD 5
हे पान रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शिक्षणासाठी आहे. ही माहिती प्रत्यक्ष तपासणी, MRI/X-ray interpretation आणि वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. शेवटचा आढावा: ऑगस्ट २०२६, डॉ. प्रशांत पराते, DNB Orthopaedics, Fellowship in Arthroscopy & Sports Medicine (Thammasat University Hospital, Thailand). MMC Reg. 2006042129.